वृत्तसंस्था
लखनऊ : देशाच्या अनेक भागांत शनिवारी रात्री चंद्रदर्शन झाले. त्यामुळे रमजानचे रोजे सुरू झाले आहेत. दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी तथा लखनऊ इदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी यांनी यासंबंधीची घोषणा केली. रविवारी रमजानचा पहिला उपवास अर्थात रोजा ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. Ramadan fasting begins due to moon visibale in up
रमजानची सुरुवात चंद्रदर्शनाने होते. या महिन्यात उपवास ठेवणे इस्लामच्या प्रमुख कर्तव्यांपैकी एक आहे. त्यामुळे जगभरातील मुस्लिम बांधव या काळात महिनाभर रोजा पाळतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App