काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनांनाही संपूर्ण पाठिंबा, राहुल गांधी यांचे खुले पत्र


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही न पाहणारे कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना आता शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषि कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यावर निर्माण झालेल्या उन्मादाच्या लाटेवर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.Rahul Gandhi’s open letter to the Congress for its full support to the future agitations of the farmers

शेतकऱ्यांच्या भविष्यातील आंदोलनालाही संपूर्ण पाठिंबा देऊ, असे खुले पत्र राहूल गांधी यांनी लिहिले आहे.राहूल गांधी यांनी म्हटले आहे की, तीन नवे कृषी कायदे रद्द झाल्याने शेतकरी आंदोलकांचा मोठा विजय झाला आहे. शेतकरी भविष्यात करणार असलेल्या इतर आंदोलनांनाही काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा राहील.



शेतकऱ्यांचा लढा अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांची गुलामासारखी स्थिती करण्याचे कारस्थान पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करू नये. त्याऐवजी मोदींनी २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन प्रत्यक्षात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत.

आपला फायदा व तोटा कशात आहे हे शेतकऱ्यांना नीट कळते. राजकारणाचा उपयोग जनहितासाठी करायचा असतो. लोकशाहीमध्ये अहंकाराला जागा नसते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi’s open letter to the Congress for its full support to the future agitations of the farmers

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात