विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) मोठी भेट मोदी सरकारकडून मिळणा आहे. ओबीसी क्रिमी लेअरची मर्यादा १० लाखांपर्यंत वाढविण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. सध्या ही मर्यादा आठ लाख रुपये आहे. मर्यादा वाढल्यावर जास्तीत जास्त लोकांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.OBCs to get gift, Modi government’s recommendation to increase creamy layer limit to Rs 10 lakh
मोदी सरकारने वैद्यकीय प्रवेशात देशपातळीवरील कोट्यात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता ही भेट मिळणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ही मर्यादा १२ लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळेल. इतर मागासवर्गीय समाज घटकांकडून दीर्घ काळापासून ही मागणी केली जात आहे.
ओबी आरक्षणासाठी मर्यादा यापूर्वी २०१७ मध्ये वाढविण्यात आली होती. त्यावेळी असलेली सहा लाखांची मर्यादा वाढवून आठ लाख करण्यता आली होती. केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव विचारधिन असल्याचे सांगितले. दर तीन वर्षांनी क्रिमी लेअरच्या मर्यादेवर पुनर्विचार केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने ही तयारी सुरू केली आहे.
यासाठी तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यात येत आहे. संसदेच्या स्थायी समितीमध्येही यावर विचार सुरू आहे. यासाठी वेतनाचाही विचार करावा, असे म्हटले जात आहे. मात्र, ओबीसींकडून त्याचा विरोध होत आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे, त्यांनाच लाभ व्हावा असे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App