केवळ आश्वासन नाही तर शहिदांच्या पत्नीला अमित शहा यांनी दिले थेट नियुक्तीपत्र

विशेष प्रतिनिधी

जम्मू : शहीद पोलिसाच्या कुटुंबाला केवळ कोरडे आश्वासन नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पत्नीला थेट नियुक्तीपत्र दिले.नवगावला येथे अमित शहा यांनी शहीद पोलीस निरीक्षक परवेझ धर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.Not only assurance but direct appointment letter given by Amit Shah to the wife of the martyr

या दरम्यान त्यांनी परवेझ यांची पत्नी फातिमा धर यांना प्रशासनात सरकारी नोकरी देण्याचं केवळ आश्वासन दिलं नाही तर थेट नियुक्ती पत्र सोपवले.जम्मू काश्मीरमधून 379 कलम हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच शहा केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारपासून तीन दिवसांच्या या दौऱ्यात पहिल्याच दिवशी गृहमंत्री श्रीनगरला दाखल झाले.



या दौऱ्यात जम्मू काश्मीरच्या नागरिकांत विश्वास निर्माण करण्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा मानस आहे. या दरम्यान ते खोऱ्यातील सुरक्षास्थितीचा आढावाही घेणार आहेत.
त्याची सुरुवात त्यांनी शहिदांच्या कुटुंबातील लोकांची भेट घेऊन केली.

Not only assurance but direct appointment letter given by Amit Shah to the wife of the martyr

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात