विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : माजी गृहमंत्री अनिल देशमुख मराठा होते म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे शरद पवार दादऊचा माणूस आहेत की काय, अशी शंका येऊ लागली आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी म्हटले आहे.Nilesh Rane said, Maratha Anil Deshmukh resigned but did not Nawab Malik, so it is doubtful whether Sharad Pawar is Dawood’s man.
पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, ईडीने अटक केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही. कारण नवाब मलिक हे पवारांचे खास आहेत. अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे.
ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?नवाब यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच काळजी अनिल देखमुखांच्या वेळी कुठे होती? असा सवालही निलेश यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App