देशात सर्वाधिक गुन्हेगार ‘राजद’मध्ये आहेत, तेजस्वी यादवला कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही – प्रशांत किशोर

जन सूरज पदयात्रेच्या 201व्या दिवशी बोलताना पीके यांनी केली टीका

विशेष प्रतिनिधी

पाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, देशात आरजेडीपेक्षा जास्त गुन्हे करणारे आणि गुन्हेगार देशातील दुसऱ्या कोणत्याही पक्षात नाहीत. Most criminals in the country are in RJD Tejashwi Yadav has no knowledge of any subject  Prashant Kishor

याचबरोबर तेजस्वी यादव यांना कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही. जन सूरज पदयात्रेच्या 201 व्या दिवशी गुरुवारी वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर ब्लॉक अंतर्गत चक बाफापूर बंथू पंचायत येथून प्रशांत किशोर बोलत होते.

पीके यांनी जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल करत प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारच्या लोकांना मूर्ख समजले जाते, पण तेजस्वी यादव माझ्यापेक्षा इंग्रजी, फ्रेंच चांगले बोलू शकतात का? प्रशांत किशोर म्हणाले की, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आमच्यापेक्षा चांगले भोजपुरी बोलतील का? तेजस्वीला ना इंग्रजी येतं ना भोजपुरी नीट येतं. त्याने आयुष्यात काहीही वाचले नाही आणि कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही.

Most criminals in the country are in RJD Tejashwi Yadav has no knowledge of any subject  Prashant Kishor

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात