राष्ट्रकुल स्पर्धा 2022 : सुवर्णपदक विजेत्या साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी पटकावलेली पदके, घरातले पाहा फोटो!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारतीय कुस्तीगीर कुस्तीगिरांनी उत्तम कामगिरी करत आतापर्यंत 3 सुवर्णपदके पटकावले आहेत. Medals bagged by gold medalists Sakshi Malik and Bajrang Punia

साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आपापल्या कॅटेगिरीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करून सुवर्णपदके पटकावली आहेत. या वृत्तसंस्थेने या दोन्ही कुस्तीगिरांच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया घेतले आहेत. अर्थातच दोघांच्या कुटुंबीयांनी अतिशय आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पण त्याचवेळी गुप्तसंस्थेने दोघांच्याही घरातील फोटो ट्विटर हँडल वर शेअर केले आहेत. साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आपल्या क्रीडा कारकीर्दीत असंख्य पदके पटकावली आहेत. ऑलिंपिक पदकापर्यंत धडक मारली आहे. त्यांचे अनेक फोटो आणि पदके दोन्ही कुटुंबीयांनी जपून ठेवली असून ती घरातल्या दर्शनी भागातही लावली आहेत.

साक्षी मलिक हरियाणातील रोहतक मध्ये राहते, तर तर बजरंग पुनिया हा देखील हरियाणाचाच रहिवासी असून तो सोनीपत मध्ये राहतो. हे पहा या दोन्ही कुस्तीगीरांच्या घरातले फोटो.

Medals bagged by gold medalists Sakshi Malik and Bajrang Punia