विशेष प्रतिनिधी
केरळ : केरळ देशातील सर्वोत्तम शासित राज्यांपैकी एक आहे असे अनुमान सेंटर ऑफ पब्लिक अफेअर्स च्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी सांगितले.
Kerala is the best governed state in the country; Chief Minister Pinarayi Vijayan
मुख्यमंत्र्यांनी फेसबूक पोस्टमध्ये ही बातमी शेअर करत लिहिले आहे, सी पी ए ने जाहीर केलेल्या पब्लिक अफेअर्स इंडेक्स 2021 अनुसार पायाभूत सुविधा, शिक्षण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केरळने उत्कृष्ट प्रशासित कामगिरी केली आहे. आरोग्य, रोजगार, पर्यावरणपूरक आणि सर्वांगीण विकास या सर्वदृष्टीने केरळ राज्य व देशातील इतर राज्यांपेक्षा अग्रेसर आहे. हे निर्देशांक समानता, वाढ आणि टिकाव या तीन निकषांवर आधारित आहेत. असे देखील त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
Kerala Cabinet : पिनरई मंत्रिमंडळात जावयाची वर्णी; पण कोरोना योद्धा केके शैलजांना धक्कादायकरीत्या नारळ
राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि कोविड प्रतिबंध यांसारख्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हे देखील या अभ्यासात पाहिले आहे. अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App