मनीष सिसोदियांना बंगला सोडण्याची नोटीस; सत्येंद्र जैन – सिसोदियांमध्ये केजरीवालांकडून भेदभाव

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे स्वतःखेरीज दुसऱ्या कोणाचेही नाहीत, असे आरोप करून आम आदमी पक्षात सुरुवातीपासून असलेले अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत. याचेच प्रत्यंतर आता दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना आल्याशिवाय राहिलेले दिसत नाही.Kejriwal had promise to look after Manish Sisodia and his family. But he was removed as minister almost immediately, while Satyendra Jain was retained as minister for 9 months,

कारण दिल्लीच्या दारू घोटाळ्यात मनीष सिसोदियांची रवानगी तुरुंगात झाल्याबरोबर सिसोदिया यांना दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून मिळालेला सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. तो बंगला आता सिसोदियांच्या जागी मंत्री बनलेल्या आतिशी यांना देण्यात येणार आहे.



मात्र, हेच ते मनीष सिसोदिया आहेत ज्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचा शब्द स्वतः अरविंद केजरीवाल यांनी त्यांना दिला होता. पण सिसोदियांची रवानगी तुरुंगात झाल्याबरोबर त्यांना बंगला खाली करण्याची नोटीस दिल्ली सरकारने पाठवली आहे.

मनीष सिसोदियांना एक न्याय, तर दिल्लीचे शिक्षण मंत्री सत्येंद्र जैन यांना दुसरा न्याय, असा केजरीवालांचा खाक्या आहे. किंबहुना केजरीवालांनी हा भेदभाव केला आहे. सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रीग प्रकरणात तुरुंगात गेल्यानंतर देखील तब्बल 9 महिने केजरीवालांनी त्यांचा राजीनामा घेतला नव्हता. त्यांच्याकडे शासकीय बंगला तसाच ठेवला. पण सिसोदिया यांना मात्र बंगला सोडण्याची नोटीस देऊन अरविंद केजरीवालांनी दोन मंत्र्यांमध्ये भेदभाव केल्याचे देखील दिसून आले आहे. या संदर्भात भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे.

Kejriwal had promise to look after Manish Sisodia and his family. But he was removed as minister almost immediately, while Satyendra Jain was retained as minister for 9 months,

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात