कन्हैया कुमार हा तर रंग बदलणारा सरडा, राहूल गांधींनी बाहेर काढल्यावर भाजपातही प्रवेश करू शकतो, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांची टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जेएनयूचा विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हा रंग बदलणारा सरडा असल्याचा आरोप चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी केल आहे. राहुल गांधी जेव्हा बाहेर काढतील तेव्हा हा भाजपात प्रवेश करु शकतो. आश्चर्य वाटू देऊ नका, असेही पंडित यांनी म्हटले आहे.Kanhaiya Kumar is a color-changing lizard, can join BJP after Rahul Gandhi’s ouster, criticizes filmmaker Ashok Pandit

पंडित यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या जुन्या व्हिडीओत कन्हैय्या कुमार म्हणत आहे की भारताचा विनाश करण्यासाठी एकटी काँग्रेस पुरेशी होती. दुसरीकडे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने म्हटले आहे की जर काँग्रेसच वाचली नाही तर देशही वाचणार नाही. कन्हैय्या कुमारचा हा व्हिडीओ ट्विटरला शेअर करताना अशोक पंडित यांनी सरड्याचे बदलते रंग असे म्हटले आहे.



कन्हैय्या कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा एका जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कन्हैय्या कुमार काँग्रेस पक्षावर टीका करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत चित्रपट निर्मात्याने कन्हैय्या कुमारची तुलना सरड्याशी केली आहे.

अशोक पंडित यांनी कन्हैय्या कुमारवर टीका करताना म्हटले आहे की, राहुल गांधी जेव्हा बाहेर काढतील तेव्हा हा भाजपात प्रवेश करु शकतो. आश्चर्य वाटू देऊ नका.अशोक पंडित यांच्या ट्वीटवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.

सतीश कुमार नावाच्या एका युजरने म्हटले आहे की, तुम्हाल लाज वाटली पाहिजे. राज्य आणि देशाच तुमचे सरकार असूनदेखील ही व्यक्ती जेलमध्ये नाही. का आपल्या अपयशाचे ढोल वाजवत जगाला सांगत आहात.

अशोक पंडित यांनी याआधी राहुल गांधींच्याही एका ट्वीटवरुन टोला लगावला होता. राहुल गांधी यांनी ट्वीट करत,आपण सर्व भारत असून द्वेषावर विजय मिळवू असे म्हटले होते. यावर अशोक पंडित यांनी आमच्यासाठी काँग्रेसमुक्त भारतच भारत आहे असा टोला लगावला होता.

Kanhaiya Kumar is a color-changing lizard, can join BJP after Rahul Gandhi’s ouster, criticizes filmmaker Ashok Pandit

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात