अयोध्या राम मंदिर : श्री रामलल्ला यांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला!!


वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्ला यांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला आहे. अयोध्येतील राम जन्मभूमि मंदिराचे काम सन 2023 मध्ये पूर्ण होईल आणि 24 जानेवारी 2024 रोजी शुभमुहूर्तावर श्रीराम लल्लांची प्रतिष्ठापना गर्भगृहात होणार आहे. It was the moment of installation of Shri Ramallah !!

या संदर्भातली माहिती रामलल्ला यांचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी दिली आहे. गर्भगृहाचे काम लाल दगडा मध्ये पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यातच राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी अयोध्येतील राम मंदिराचे बहुतांशी काम सन 2023 मध्ये पूर्ण होईल आणि 2024 च्या सुरुवातीला फक्त जनांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुले होईल, अशी माहिती नाशिक मध्ये दिली होती. त्याच वेळी त्यांनी योग्य मुहूर्तावर रामलल्लांची प्रतिष्ठापना करण्यात येईल, असे जाहीर केले होते.

या पार्श्वभूमीवर रामलल्ला यांचे मुख्य पुजारी सत्येन्द्र दास जी महाराज यांनी श्रीराम लल्ला यांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त सांगितला आहे. 24 जानेवारी 2000 24 रोजी उत्तम मुहूर्त आहे. या सुमुहूर्तावर रामलल्लांची प्रतिष्ठापना रामजन्मभूमी मंदिरातल्या गर्भगृहात समंत्र केली जाईल, असे सत्येन्द्र दास महाराज यांनी सांगितले आहे.

24 जानेवारी 2024 रोजी बुधवार, पौष शुद्ध चतुर्दशी, वैधृती योग, गद महायोग आहे. या शुभमुहूर्ताच्या दिवशी राम राजांची प्रतिष्ठापना गर्भगृहात समंत्र केली जाईल.

It was the moment of installation of Shri Ramallah !!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात