विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये माफिया हे तुरुंगामध्ये किंवा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत आढळतील. तुम्ही उत्तर प्रदेशमधील माफियांचा शोध घेतला तर ते केवळ तीनच जागी दिसतील. त्या जागामध्ये तुरुंग, उत्तर प्रदेशच्या बाहेर आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवार यादीचा समावेश आहे,In Uttar Pradesh’s Mafia in Jail or in the Samajwadi Party’s candidate list, Amit Shah’s attack
असा हल्लाबोल केंद्रीय गृह मंत्रीसमाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीका करताना शाह म्हणाले, बहनजी (मायावती) आणि अखिलेश (यादव) सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशच्या लोकांना हे गुंड छळतील. उत्तर प्रदेशमध्ये पोलीस आधी माफियांना घाबरायचे.
आता योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली माफिया उत्तर प्रदेशच्या बाहेर गेले आहेत.उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १४ फेब्रुवारी रोजी होईल.
तिसरा टप्पा २० फेब्रुवारी, चौथा २३ आणि पाचवा टप्पा २७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. अंतिम दोन टप्पे ३ मार्च आणि सात मार्च रोजी पार पडणार आहेत. मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App