जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक, सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा केला खात्मा

two militant killed  in Jammu-Kashmir Encounter between the security forces and terrorists search going on

पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

विशेष प्रतिनिधी

 जम्मू-काश्मीर :  भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेला लागून असलेल्या कुपवाडा जिल्ह्याजवळ सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत हे दहशतवादी मारले गेले आहेत. In an encounter in Jammu and Kashmirs Kupwara security forces killed five terrorists

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या गोळाबारात ५ पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत.

लष्कराने पुंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला –

लष्कराने गुरुवारी (15 जून) जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि नियंत्रण रेषेजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शोध मोहिमेदरम्यान ही जप्ती करण्यात आली असून त्यात स्टील कोर काडतुसे आणि पाकिस्तानमध्ये बनवलेल्या औषधांचाही समावेश आहे.

भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सतर्क जवानांनी 14 आणि 15 जूनच्या मध्यरात्री कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, असे जम्मूमधील लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले आहे .

In an encounter in Jammu and Kashmirs Kupwara security forces killed five terrorists

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात