चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल, राखी सावंतचा आपचे नेते राघव चढ्ढा यांना इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंजाबमधील कॉँग्रेसमधील अंतर्गत वादावर टीका करताना राखी सावंतचे नाव घेतल्याबद्दल आपचे नेते राघव चढ्ढा यांना बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने कडक इशारा दिला आहे. चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल, असा इशारा राखी सावंतने दिला आहे.If Chadha takes my name, your Chadha will come down, Rakhi Sawant warns your leader Raghav Chadha

कांग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्धू हे पंजाबी राजकारणाचे राखी सावंत असल्याचे वक्तव्य राघव चड्ढा यांनी केले. याविषयी कळल्यानंतर संतप्त राखीने राघव यांना इशारा दिला आहे.



काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले होते. हे पाहता आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाना साधत त्यांना पंजाबच्या राजकारणाची राखी सावंत म्हटले.

जेव्हा राखी सावंतला हे कळले तेव्हा तिने राघव यांना सुनावले आणि म्हणाली, राघव चड्ढा, माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा. मिस्टर चड्ढा, तुम्ही स्वत: बघा, ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला माझे नाव हवे होते. जर तुम्ही माझ्या नावाचा वापर केलात तर मी तुमचा चड्ढा उतरवेन.

राखीने एका ट्वीटच स्क्रिनशॉर्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे ट्वीट रितेश नावाच्या व्यक्तीने केले आहे. ट्वीटमध्ये त्या व्यक्तीने आम आदमी पक्षाच्या नेत्यांना कोणाचे नाव खराब करू नका आणि तुमच्या नेत्यांना शिकवा, असे म्हटले आहे.

If Chadha takes my name, your Chadha will come down, Rakhi Sawant warns your leader Raghav Chadha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात