गुपकार गॅँग पडली खोटी, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यापासून दोन वर्षांत दोघांनीच खरेदी केली मालमत्ता

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू आणि कामीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर गुपकार गॅँगकडून आरोप केला जात होता की बाहेरचे लोक येऊन जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करतील. यामुळे स्थानिक लोकांवर अन्याय होईल. परंतु, केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यापासून दोन वर्षांत केवळ दोन लोकांनी येथे मालत्ता खरेदी केली आहे.Gupkar gang lies, only two person buy property in two years since Jammu and Kashmir’s special status was revoked

गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करताना इतर राज्यांच्या लोकांना येणाऱ्या कोणत्याही अडचणी आणि अडथळ्यांविषयी विचारले असता राय म्हणाले की, अशा कोणत्याही घटनेची नोंद नाही.

जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविले गेल्यानंतर येथील नॅशनल कॉन्फरन्स, पिपल्स डेमॉक्रॅटीक पार्टी (पीडीपी) यांनी विरोध केला होता. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती सईद यांच्यासारख्या नेत्यांनी काश्मीरी जनतेला भडकाविण्यास सुरूवात केली होती.

बाहेरील राज्यांतील लोक येऊन त्यांच्या मालमत्ता खरेदी करतील. त्यांच्या उत्पन्नाच्या साधनांवर कब्जा करतील, असे म्हटले जात होते. मात्र, काश्मीरमध्ये दोन वर्षांत केवळ दोघांनीच मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांच्याविषयी आणखी माहिती गृह मंत्रालयाने दिली नाही.

Gupkar gang lies, only two person buy property in two years since Jammu and Kashmir’s special status was revoked

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात