गुलाम नबी आझादांचा काँग्रेसला दणका : जम्मू-काश्मिरात माजी उपमुख्यमंत्र्यांसह 64 नेत्यांचा काँग्रेसला रामराम


वृत्तसंस्था

श्रीनगर : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाला सतत धक्के बसत आहेत. आता जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांनी मंगळवारी 64 नेत्यांसोबत काँग्रेसचा त्याग केला. या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवला आहे. सर्व नेते आझाद यांच्या पक्षात सहभागी होतील. यादरम्यान, आझाद यांनी 4 सप्टेंबर रोजी जम्मूत सभा घेण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस सोडल्यानंतरची ही त्यांची पहिली सभा असेल. आझाद यात आपल्या पक्षाची घोषणा करू शकतात. आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी जम्मू-काश्मीरमधील अनेक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.Ghulam Nabi Azad’s blow to Congress: In Jammu and Kashmir, 64 leaders including the former Deputy Chief Minister, Ramram to Congress



अध्यक्षपदाबाबत थरूर म्हणाले, निवडणूक काँग्रेससाठी चांगली

काँग्रेसचे खासदार शशी थरूर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात. त्यांनी सांगितले की, निवडणूक पक्षासाठी चांगली राहील. थरूर यांच्या लेखानंतर ते अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात, अशी शक्यता आहे. यासंदर्भात थरूर म्हणाले, कोणतीही टिप्पणी करायची नाही. मी जे लेखात नमूद केले ते म्हणजे, निवडणूक काँग्रेससाठी चांगली ठरेल. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Ghulam Nabi Azad’s blow to Congress: In Jammu and Kashmir, 64 leaders including the former Deputy Chief Minister, Ramram to Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात