ओबीसी आरक्षणात आता चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या वादात आता देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांचा विवाह कधी झाला यावरून दावे केले जात आहेत.Devendra Fadnavis’s marriage is now being discussed in OBC reservation

ओबीसी आरक्षण मिळाले नाही तर आपण राजीनामा देऊ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते की, फडणवीसांची वक्तव्यं गांभियार्नं घेण्याची गरज नाही.



वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू म्हणाले होते. सत्तेसाठी ते काहीही बोलत असतात. त्यांच्यावर काय विश्वास ठेवता, असा सवाल त्यांनी माध्यमांना केला होता. त्यावर आता भाजपकडून पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावर भाजपचे आमदार  गोपीचंद पडळकर म्हणाले, महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात फडणवीसांचे लग्न विदर्भ यात्रेच्या पाच  वर्षं आधीच झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसींचं आरक्षण रद्द करून पुढील कायदेशीर प्रक्रिया होईपर्यंत ते रद्द राहिल, असा निर्णय दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची घोषणा केली.

राज्याची सूत्रं भारतीय जनता पक्षाकडं दिली तर दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण मिळवून देतो. जर हे मी करू शकलो नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.

Devendra Fadnavis’s marriage is now being discussed in OBC reservation

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात