विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या स्थितीबद्दल आम्हाला वाईट वाटते. पण आपण काय करू शकतो? आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगू शकतो का? असा सवाल सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी केला आहे.Can we tell Russian President Putin to stop fighting? This was stated by Chief Justice N. V. Question by Ramna
काश्मीरमधील एका ज्येष्ठ वकिलाने सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. युक्रेन-रोमानियन सीमेवर अजूनही २१३ विद्यार्थी अडकले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थिनी आहेत. त्यांच्याकडचे पैसेही संपले आहेत. अशा परिस्थितीत केंद्राने त्यांना मदत करून त्यांना परत आणण्यास सांगितले पाहिजे, अशी मागणी वकिलाने सुप्रीम कोर्टाकडे केली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत सरन्यायाधीश काहीही करत नसल्याची टीका एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आली. यावर सरन्यायाधिश म्हणाले, विद्यार्थ्यांची अवस्था पाहून आम्हालाही वाईट वाटते. पण आपण काय करू शकतो? आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगू शकतो का?
अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्ट अॅटर्नी जनरलसह विचार करेल.सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्या विद्यार्थिनीची माहिती मागवली. अॅटर्नी जनरल यांनी या तपशीलाची नोंद घ्यावी, असे सरन्यायाधीशांनी म्हटले.
याचिकाकर्ता युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. तिथे २५० विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना रोमानिया सीमेवरून बाहेर काढले जात नाहीए. ते युक्रेन सीमेवर आहेत, त्यांना रोमानियनमध्ये जाण्याची परवानगी नाही, असे याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App