बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक, कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप

Bollywood actor Jimmy Shergill arrested in Ludhiana, accused of breaking corona rules

Jimmy Shergill arrested : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला बुधवारी पंजाबच्या लुधियाना येथे कोरोना मार्गदर्शक तत्त्वाच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे चालान कापण्यात आले होते. अभिनेता जिमी शेरगिलने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सामाजिक अंतर तसेच इतर नियम मोडल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. Bollywood actor Jimmy Shergill arrested in Ludhiana, accused of breaking corona rules


विशेष प्रतिनिधी

लुधियाना : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला बुधवारी पंजाबच्या लुधियाना येथे कोरोना मार्गदर्शक तत्त्वाच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे चालान कापण्यात आले होते. अभिनेता जिमी शेरगिलने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सामाजिक अंतर तसेच इतर नियम मोडल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

लुधियानाती आर्य स्कूलमध्ये अनेक चारचाकी वाहने शिरली होती. आत गेल्यावर तेथे चित्रपटाची शूटिंग सुरू असल्याचे समजले. अभिनेता जिमी शेरगिल चित्रपटाच्या शूटिंगसाठी तेथे येणार होता. याची माहिती मिळताच एसीपी वरियाम सिंह यांनी पोलीस पथकासह तेथे पोहोचून शूटिंग बंद पाडली. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मंजुरीची कागदपत्रे दाखविली. यानंतर पोलिसांनी सामाजिक अंतर न पाळल्यावर दिग्दर्शकासह इतर दोघांना दोन-दोन हजारांचा दंड ठोठावला.

पोलीस म्हणाले आहे की, त्यांच्याकडे शूटिंगची परवानगी होती. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याने दोन जणांना दंड ठोठावण्यात आला. आर्य स्कूलमध्ये खूप खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत पाच ते सहा जण होते. शूटिंग वेळेवरच संपली.

Bollywood actor Jimmy Shergill arrested in Ludhiana, accused of breaking corona rules

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था