वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाचपैकी चार राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा दावा भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे.BJP regains power in four out of five states, Claims of key leaders; The opponent will fall face down
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ उत्तर प्रदेशमधील मतदानाचा एक टप्पा बाकी आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर येथे मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
या निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी उत्कृष्ट राहील, असा विश्वास प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन करणार आहे. पंजाबमध्येही भाजपची स्थिती मजबूत होईल, असे नेत्यांनी सांगितले आहे.
या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा पक्षाला मिळाल्याचे नेत्यांनी सांगितले आहे. याबाबतचा विश्वास अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App