वर्ल्ड कप टी 20 चं समालोचन होणार आता मराठीत

महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे समीकरण गेली अनेक वर्ष जपत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुन्हा एकदा हे समीकरण समोर आणल आहे.World Cup T20 will be reviewed in Marathi now


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जगभरातील सर्व क्रिकेटपटू, जे आतापर्यंत आयपीएलमध्ये एकाच संघात सोबत खेळताना दिसले होते, ते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटताना कोणतीही कसर सोडणार नाहीत.

महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे समीकरण गेली अनेक वर्ष जपत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुन्हा एकदा हे समीकरण समोर आणल आहे. नुकतीच IPL २०२१ संपली आणि याचे समालोचन इतर भाषांसोबत मराठीत देखील व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते केतन नाईक यांनी हॉटस्टार सोबत पत्रव्यवहार करत IPL चे समालोचन मराठीत करावं याची मागणी धरून ठेवली होती.



दरम्यान हॉटस्टारने आता झालेल्या सामन्यांचं समालोचन मराठीत केलं आहे.भारत-पाकिस्तान यांच्यातील मॅचपासून वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे आणि याच मॅचपासून मराठीतून समालोचन होणार आहे.

मराठी Commentry चा इतका हट्ट का? हा प्रश्न विचारण्यात आला होता .या प्रश्नाला उत्तर देताना केतन नाईक म्हणाले कि, ‘विषय नुसता समालोचनाचा नसून त्यातून निर्माण होत असलेल्या अर्थकारणमुळे मराठी भाषेतील जाणकारांना रोजगार मिळणार असेल तर तो आम्हाला हवा आहे आणि अशाच प्रकारचं काम राज ठाकरे त्यांना अपेक्षित असतं.

World Cup T20 will be reviewed in Marathi now

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात