पंजाबचा सीएम किंवा थेट “खलिस्तान”चा पहिला पीएम बनेन!!; केजरीवालांचा धोकादायक चेहरा उघड


प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब मध्ये निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना राजकीय पक्षांचे सर्वच नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते कुमार विश्वास यांनी जोरदार तोफ डागली आहे. यातून दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देशाच्या एकात्मतेवर घाव घालणारा अत्यंत धोकादायक चेहरा समोर आला आहे.Will be the CM of Punjab or the first PM of “Khalistan” !!; Kejriwal’s dangerous face exposed

कुमार विश्वास म्हणाले, की अरविंद केजरीवाल एकदा मला म्हणाले होते, की ते स्वतः पंजाबचे मुख्यमंत्री तरी होतील किंवा स्वतंत्र खलिस्तानचा पहिले पंतप्रधान तरी होतील, असा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. आम आदमी पार्टीचा खरा चेहरा हा फुटीरतावादाचा आहे. हेच यातून दिसून येते. पंजाब मध्ये कशीही करून त्यांना सत्ता मिळवायची होती आणि आहे.याबद्दल मी अरविंद केजरीवाल यांना फॉर्म्युला विचारला, तेव्हा ते म्हणाले मी दोन समुदायांना आपापसात लढवेन. त्यामुळे मत विभाजन होऊन आम आदमी पार्टी जिंकेल आणि मी पंजाबचा मुख्यमंत्री होईन आणि तसे नाही झाले तर निदान स्वतंत्र देश खलिस्तानचा पहिला पंतप्रधान तरी होईन, असे अरविंद केजरीवाल म्हणाल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. कुमार विश्वास यांचा हा व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

आम आदमी पार्टी पंजाब मध्ये निवडणूक लढवत आहे. सर्व वृत्तवाहिन्यांच्या ओपिनियन पोल मध्ये आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये मोठे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे. विद्यमान कॉंग्रेस सरकारला आम आदमी पार्टी जोरदार टक्कर देऊन सत्तेवर देखील येऊ शकते, असे काही ओपिनियन पोलचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट तोफ डागून कुमार विश्वास यांनी पंजाब आणि दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

अर्थात अरविंद केजरीवाल यांनी आपण खलिस्तानचे पहिले पंतप्रधान होऊ असे विधान केले आहे का? याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. आम आदमी पार्टीने देखील याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही.

Will be the CM of Punjab or the first PM of “Khalistan” !!; Kejriwal’s dangerous face exposed

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*