वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरी मध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये दंगली पासून केंद्रीय गृह राज्य मंत्री मिश्र यांच्यावर आरोप झाले. त्यांना प्रत्युत्तरे पण दिली गेली, आज विरोधकांच्या राजकारणाचे सगळे रस्ते लखीमपुर खीरी कडे वळले आहेत. Why are people being stopped from visiting Lakhimpur Kheri? Section 144 has been imposed in Lakhimpur Kheri then why isn’t one allowed to land in Lucknow? Do people no longer have rights in UP? Does one need a visa to visit UP?: Chhattisgarh CM Bhupesh Baghel
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव लखीमपुर खीरी कडे जायला निघाले असताना त्यांना पोलिसांनी अडवले असून त्यांनी लखनौत विक्रमादित्य मार्गावरील आपल्या निवासस्थानाच्या समोरच्या रस्त्यावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समवेत खासदार शिवपाल यादवही उपस्थित आहेत. दुसरीकडे प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने स्थानबद्ध केल्याच्या बातम्या आहेत. त्यादेखील लखीमपुर खीरी कडेच निघाल्या होत्या.
Why are people being stopped from visiting Lakhimpur Kheri? Section 144 has been imposed in Lakhimpur Kheri then why isn't one allowed to land in Lucknow? Do people no longer have rights in UP? Does one need a visa to visit UP?: Chhattisgarh CM Bhupesh Baghel https://t.co/9HL4jC1SgS pic.twitter.com/MDIJmgyJ11 — ANI (@ANI) October 4, 2021
Why are people being stopped from visiting Lakhimpur Kheri? Section 144 has been imposed in Lakhimpur Kheri then why isn't one allowed to land in Lucknow? Do people no longer have rights in UP? Does one need a visa to visit UP?: Chhattisgarh CM Bhupesh Baghel https://t.co/9HL4jC1SgS pic.twitter.com/MDIJmgyJ11
— ANI (@ANI) October 4, 2021
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना देखील लखीमपुर खीरी गावाला भेट द्यायची आहे. परंतु त्यांची विमाने लखनौ विमानतळावर उतरू देऊ नयेत, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने काढले आहेत.
यावरून देशील विरोधकांचे भाजप विरोधात जबरदस्त आरोप सुरू असून असाच प्रसंग जेव्हा कोलकत्यात ममता बॅनर्जी यांनी घडवला होता तेव्हा मात्र विरोधकांनी पैकी एकही मुख्यमंत्री पुढे आलेला नव्हता. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विमान कोलकत्ता किंवा पश्चिम बंगालच्या कुठल्याही विमानतळावर उत्तर देण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिबंध केला होता. लखीमपुर खीरीची घटना दुर्दैवी आहेच तरी विरोधकांचे यासंदर्भातले राजकारण नाही लक्षात घेणे योग्य आहे. ज्या गावाकडे आत्तापर्यंत कोणत्याच पक्षाचे लक्ष गेले नव्हते त्या गावाला जाण्यासाठी समाजवादी पक्ष काँग्रेस यांच्यासह सर्व विरोधी पक्षांची होड लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App