वृत्तसंस्था
बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीसाठी ५०.४१ टक्के मतदान झाले. आता बेळगाव पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार ?, याचा निकाल सोमवारी (ता.६ ) लागणार आहे. Whose flag will be hoisted on Belgaum Municipality? ; 50.41 per cent turnout, results declared on Monday
एकूण २१७१६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्या मध्ये ११३३९६ पुरुष तर १०३७६४ महिलांचा समावेश आहे. निवडणुकीत ५८ प्रभागांसाठी मतदान झालं असून एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता ६ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान यंत्राचा वापर केला. महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून १८२६ निवडणूक कर्मचारी नियुक्त केले होते.
भाजप ५५ ,काँग्रेस ४५ , महाराष्ट्र एकीकरण समिती २१, जे डी एस ११ , आम आदमी ३७ , एआयएमआयएम ७ , अन्य दोन आणि अपक्ष २१७ असे उमेदवारांनी निवडणूक लढवली. ४१५ मतदान केंद्रांवर लोकांनी मतदान केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App