दारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पाहिल्यावर तहसीलदारासाठी लाच म्हणून घेतलेली पाच लाख रुपयांची रोकड एकाने चक्क पेटवून दिली. विशेष म्हणजे त्याने गॅसवर या नोटा पेटविल्या.When he saw the ACB at the door, he set fire to Rs 5 lakh notes
विशेष प्रतिनिधी
हैद्राबाद : दारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पाहिल्यावर तहसीलदारासाठी लाच म्हणून घेतलेली पाच लाख रुपयांची रोकड एकाने चक्क पेटवून दिली. विशेष म्हणजे त्याने गॅसवर या नोटा पेटविल्या.
तेलंगणा राज्यातील नागरकुर्नूल जिल्ह्यामध्ये वेलदांडाचा तहसिलदार सैदुलुने वेंकटय्या गौड नावाच्या व्यक्तीला ५ लाख रुपये ठेऊन घ्यायला सांगितले होते. या तहसिलदाराने एका कामाला मंजूरी देण्यासाठी ५ लाखांची रक्कम लाच म्हणून घेतली होती.
त्यामुळे ठरल्यानुसार संबंधित व्यक्तीने ५ लाख रोख गौडकडे दिले होते. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची खबर लागली. त्यांनी वेंकटय्याच्या घरी छापा टाकला. दारात पोलीस आल्याचे पाहून घाबरलेल्या वेंकटय्याने थेट किचनमधला गॅस पेटवला
आणि ५ लाखांची रोकड गॅसवर ठेऊन दिली. मात्र, पोलीसांनी घरात शिरून जळणाºया ५ लाखांच्या नोटा विझवल्या. ९२ हजार रुपयांच्या २ हजाराच्या ४६ नोटा पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. मात्र, उर्वरित रक्कम पोलीसांनी जप्त केली.
काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्येही असाच प्रकार घडला होता. तेथेही तहसीलदाराने लाच म्हणून घेतलेले पाच लाख रुपये पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App