लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पाहिले आणि तहसीलदाराने २० लाख रुपये चक्क गॅसवर जाळले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा घरावर पडत असल्याचे दिसताच राजस्थानातील एका तहसीलदाराने दार बंद करून २० लाख रुपयांची रोकड जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. ACB officials spotted and Tehsildar burnt Rs 20 lakh on gas


विशेष प्रतिनिधी

जयपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा घरावर पडत असल्याचे दिसताच राजस्थानातील एका तहसीलदाराने दार बंद करून २० लाख रुपयांची रोकड जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.
राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील पिंडो बारात येथील हा प्रकार घडला. कल्पेशकुमार जैन हा येथील तहसीलदार आहे. कुमार याच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला होता. त्याने अधिकाऱ्यांना पाहून दरवाजा बंद केला आणि तब्बल 20 लाख रुपये गॅसवर जाळण्याचा प्रयत्न केलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दरवाजा तोडून अर्ध्या जळालेल्या नोटांसह तहसीलदार कल्पेश कुमार जैनला अटक केली. एसीबीला तक्रार मिळाली होती की तहसीलदार आपल्या राजस्व निरीक्षक पिण्डवाडाच्या माध्यमातून तिथे होणाºया आवळा उत्पादनाच्या आवळा सालीच्या करारासाठी 1 लाख रुपयांची लाच मागत होते. तक्रार मिळाल्यावर पाली येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टीम पाठवली आणि तिथे 1 लाख रुपयांची लाच घेताना राजस्व निरीक्षक परबत सिंह यांना अटक केली. परबत सिंह यांनी सांगितलं की हा पैसा ते तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांच्यासाठी घेत आहेत. त्यानंतर परबत सिंह यांना घेऊन एसीबी तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांच्या घरी पोहोचली.

एसीबी येताच तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांनी दार बंद केलं आणि नोटा आगीच्या हवाले केल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घरातून निघणारा धूर पाहिला आणि दार तोडून घराच्या आत घुसले. जवळपास 20 लाख रुपयांपेक्षा जास्तच्या नोटा जळाल्या होत्या, तरी यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरुन 1 लाख 60 हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या इतर संपत्तीचा तपास सुरु आहे. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तहसीलदार कल्पेश कुमार जैन यांची कसून चौकशी करत आहेत.

ACB officials spotted and Tehsildar burnt Rs 20 lakh on gas

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*