वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसची गटबाजी थांबविताना नाकीनऊ आलेल्या काँग्रेस नेत्यांनी त्यावर एक तोड काढली आहे. राज्याच्या निवडणूका कोणा एका गटाच्या प्रमुखाच्या नावावर लढण्यापेक्षा त्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय जाहीर करून टाकला आहे.We will fight the Punjab Assembly election under the leadership of Sonia Gandhi & Rahul; Gandhi; Congress MP & president of Congress panel over Punjab affairs, Mallikarjun Kharge
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग किंवा त्यांचा विरोधक नवज्योत सिंग सिध्दू या दोघांपैकी कोणाचेही नाव काँग्रेस पुढे आणू इच्छित नाही, असे पंजाबमधील काँग्रेसचा वाद मिटविण्यासाठी नेमलेल्या नेते गटाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी सूचित केले. काँग्रेस पंजाबमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. पक्षात सगळे आलबेल होईल, असे खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तत्पूर्वी, अमरिंदर सिंग यांनी आज मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संसदेतील कार्यालयामध्ये येऊन खर्गे आणि हरिष रावत यांची भेट घेतली. आपल्या गटाची बाजू त्यांनी या दोन्ही नेत्यांच्या पॅनेलपुढे मांडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
याचा अर्थ निवडणूकीपूर्वी जरी अमरिंदर सिंग यांना काँग्रेस मुख्यमंत्रीपदावरून हटविणार नसली तरी त्यांचे नाव पुढच्या मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करून निवडणूक लढविणार नाही, हे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे दिसते.
नवज्योज सिंग सिध्दू यांच्या पाठिशी २० ते २५ आमदार आहेत. ते आपल्या गटासाठी अमरिंद सिंग यांच्या मंत्रिमंडळात स्थान आणि अधिकारपदे मागत आहेत. पण अमरिंदर सिंग हे बधायला तयार नाहीत. उलट त्यांनी सगळा आम आदमी पक्ष फोडून त्यांचे ५ आमदार आपल्या गोटात ओढले आहेत.
त्यामुळे पंजाबमध्ये आपण जोडतोडीचे राजकारण करू शकतो, हे अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसश्रेष्ठींना देखील दाखवून दिले आहे. तरीही पुढच्या निवडणूकीसाठी काँग्रेसश्रेष्ठींनी अमरिंदर सिंगांचा पत्ता कट केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
We will fight the Punjab Assembly election under the leadership of Sonia Gandhi & Rahul; Gandhi; Congress MP & president of Congress panel over Punjab affairs, Mallikarjun Kharge
महत्त्वाच्या बातम्या
- म्यानमारमधील संघर्षांचा लाखो नागरिकांना फटका, लाखो जण देश सोडण्याच्या तयारीत
- राज्यात म्युकरमायकोसिस रूग्णसंख्या पोचली सात हजारांवर; ७२९ रूग्ण आजपर्यंत दगावले
- पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा
- करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने ब्रिटनची उडाली झोप
- मुलीचे शाळेत अॅडमिशन नाही, बापाने ई-मेलद्वारे दिली चक्क मंत्रालय बॉम्बने उडविण्याची धमकी