WATCH : देशातील सर्व 15% मुस्लिम मते काँग्रेसला मिळाली तरी ते जिंकतील कसे? हिंदूंची मने जिंकणे गरजेचे- रफीकुल इस्लाम

वृत्तसंस्था

गुवाहाटी : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. आतापर्यंत विविध वक्तव्यांनी ही निवडणूक गाजली आहे. यादरम्यान आसामच्या एआययूडीएफ पक्षाचे सरचिटणीस रफिकुल इस्लाम यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना रफिकुल यांनी काँग्रेस मुस्लिमांचे लांगुलचालन करत असल्याबद्दल टीका केली आहे.WATCH: Even if Congress gets all 15% Muslim votes in the country, how will it win? It is necessary to win the hearts of Hindus – Rafiqul Islam



रफिकुल इस्लाम म्हणतात, “काँग्रेसचे काय झाले आहे ते देवालाच माहीत. हिंदूंचे ध्रुवीकरण करून भाजप जिंकत आहे. ज्या देशात 85% हिंदू आहेत, त्यांना एकत्र आणण्यासाठी भाजप रात्रंदिवस काम करत आहे आणि दुसरीकडे, काँग्रेस 15% मुस्लिमांना वेगळे करण्याचे काम करत आहे. यामुळे काय साध्य होणार आहे? समजा भारतातील अख्ख्या मुस्लिम लोकसंख्येनेही काँग्रेसला मतदान केले, तरीही यामुळे पक्षाला काय फायदा होणार आहे? खरं तर काँग्रेसने हिंदू पट्ट्यात जायला पाहिजे, त्यांच्या समस्या ऐकून त्यांची मने जिंकायला हवी होती…. सर्व हिंदू मते भाजपकडे जात आहेत, मग 15% मुस्लिमांची मते काँग्रेसला कशी मदत करणार?

खरं तर काँग्रेसवर नेहमीच तुष्टीकरणाचे आरोप होत आले आहेत. नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले गौरव वल्लभ यांनीही काँग्रेसींसारख्या सनातनला शिव्या देऊ शकत नाही म्हणत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. रफिकुल इस्लाम यांनी काँग्रेसची दशा आणि दिशा यावर दिलेली प्रतिक्रिया समाजमाध्यमांवरही चर्चिली जात आहे.

WATCH: Even if Congress gets all 15% Muslim votes in the country, how will it win? It is necessary to win the hearts of Hindus – Rafiqul Islam

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात