लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 10 राज्यांतील 96 जागांवर आज मतदान!

Voting today in 96 seats in 10 states for the fourth phase of Lok Sabha elections

दिग्गजांचे भवितव्य लागले आहे पणाला Voting today in 96 seats in 10 states for the fourth phase of Lok Sabha elections

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांतर्गत, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासह 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 96 जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये या चौथ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.

या टप्प्यात समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा, पंकजा मुंडे आणि एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांसारख्या अनेक प्रमुख उमेदवारांच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्व 25 जागांसाठी आणि विधानसभेच्या सर्व 175 जागांसाठी 13 मे रोजी निवडणुका होणार आहेत. राज्यात वायएसआरसी, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडी’ आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. राज्यातील एनडीएमध्ये भाजप, चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाचा समावेश आहे. या टप्प्यात ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान होणार आहे.

या टप्प्यातील काही प्रमुख उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग (बेगुसराय, बिहार), नित्यानंद राय (उजियारपूर, बिहार) आणि रावसाहेब दानवे (जालना, महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण (दोघेही बहरामपूर, पश्चिम बंगाल), भाजपच्या पंकजा मुंडे (बीड, महाराष्ट्र), एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (हैदराबाद-तेलंगणा) आणि आंध्र प्रदेश राज्य काँग्रेस अध्यक्ष वायएस शर्मिला (कुड्डापह) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Voting today in 96 seats in 10 states for the fourth phase of Lok Sabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात