MP Chandrashekhar : प्रयागराजमध्ये हिंसाचार : खासदार चंद्रशेखर यांना रोखल्याने उपद्रवींचा धुडगुस; पोलिस अन् लोकांवर दगडफेक

MP Chandrashekhar

समर्थकांनी अनेक वाहने देखील जाळली; पोलिसांकडून धरपकड सुरू


विशेष प्रतिनिधी

लखनऊ – MP Chandrashekhar   यूपीतील प्रयागराजमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. प्रयागराजच्या रस्त्यांवर २ तासांपासून उपद्रवींच्या जमावाने उघडपणे गोंधळ घातला आहे. जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला, दगडफेक केली आणि डायल ११२ वाहनास उलटवले. बदमाशांनी पोलिस पथकावरही दगडफेक केली. रोडवेज बसेसची तोडफोड करण्यात आली आणि अनेक दुचाकी जाळण्यात आल्या.Prayagraj Rioters

हा संपूर्ण गोंधळ भीम आर्मी प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या प्रयागराजमधील समर्थकांनी केला आहे. चंद्रशेखर आझाद कौशांबीला जायचे होते पण पोलिसांनी त्यांना प्रयागराजमध्येच रोखले. यानंतर, भीम आर्मीचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी करछानमध्ये बराच गोंधळ घातला.



प्रयागराजचे करछना दोन तासांपासून दंगलीच्या आगीत होरपळत आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला. चंद्रशेखर प्रयागराजहून कौशांबीला जात होते. पोलिसांना चंद्रशेखर यांना घरातच नजरकैदेत ठेवले होते. यानंतर, बराच हिंसाचार झाला, दंगलखोरांनी खासगी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे. एवढंच नाहीतर करछनाच्या भादेवरा बाजारात दंगलखोरांनी सामान्य नागरिकांवरही विटा आणि दगडफेक केली. चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमीही झाले आहेत. दंगलखोरांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. बसेससह खासगी वाहनांचेही नुकसान झाले आहे.

पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली आहे?

प्रयागराजमध्ये हिंसाचार करणाऱ्यांवर पोलिस कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत हिंसाचारात सहभागी असलेल्या भीम आर्मीच्या २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे इतर गुन्हेगारांचीही ओळख पटवली जात आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींवर एनएसए आणि गुंड कायदा लागू करण्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी, हिंसाचारात झालेल्या सरकारी मालमत्तेचे नुकसान भरपाई देखील आरोपींकडून करून घेतली जाणार आहे.

Violence in Prayagraj Rioters clash after MP Chandrashekhar is stopped Stones are pelted at police and people

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात