विशेष प्रतिनिधी
बीड : Valmik Karad बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात दररोज नवनवीन सीसीटीvhfutej समोर येत आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपी सीआयडी ला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेल्याचे समोर आले आहे. तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे .Valmik Karad
30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्या मधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले. एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे
याच आलीशन गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता आहे. पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मीक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती.
सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? असा सवाल करत तपासा संदर्भात सर्व माहिती आम्हाला लेखी द्या, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासावर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शंका घेतली आहे.
देशमुख म्हणाले आहेत की मला पोलीस यंत्रणेवर शंका येत आहे. त्याचे कारण सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? माझ्या भावाचे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देताना हे महत्त्वाचे आहेत. माध्यमांना हे व्हिडिओ मिळतात मग यंत्रणेने काय केले आहे. आमचा विश्वासघात झाला तर याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला हवे आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App