मुख्तार अन्सारीला आणखी एक झटका! आता ‘या’ गुन्ह्यासाठी झाली पाच वर्षांपेक्षा जास्त कालवधीची शिक्षा

माफिया मुख्तार अन्सारीच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध माफिया मुख्तार अन्सारीच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक खटल्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तारला आणखी एका गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले आहे. Uttar Pradesh mafia Mukhtar Ansari sentenced to five years and six months and fined ten thoushand

गुरुवारी कोळसा व्यापाऱ्याच्या भावाला धमकावल्याप्रकरणी मुख्तार अन्सारी दोषी आढळला. याप्रकरणी न्यायालयाने पाच वर्षे सहा महिन्यांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे.


10 वर्षांची शिक्षा ऐकताच माफिया डॉन मुख्तार अन्सारी भर कोर्टात रडत पडला आडवा!!


काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोळसा व्यापारी नंद किशोर रुंगटा यांचा भाऊ महावीर प्रसाद रुंगटा यांना धमकी दिल्याचा आरोप मुख्तारवर होता. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी/खासदार-आमदार न्यायालयात सुरू होता. याप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी माफिया मुख्तारला दोषी ठरवत पाच वर्षे सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. गेल्या काही वर्षांत मुख्तार अन्सारीला अनेक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तुरुंगवास भोगावा लागला आहे.

मागील ऑक्टोबरमध्येही, खासदार/आमदार न्यायालयाने मुख्तार अन्सारीला गँगस्टर प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचवेळी मुख्तारला न्यायालयाने ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

Uttar Pradesh mafia Mukhtar Ansari sentenced to five years and six months and fined ten thoushand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात