वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : जगभरात कोरोनाचा उद्रेक सर्वांत जास्त झालेल्या अमेरिकेतील नागरिक आता ‘हर्ड इम्युनिटी’ (सामूहिक प्रतिकारशक्ती)कडे वेगाने जात आहेत. लस उत्पातदन आणि खरेदीवर सरकार अब्जावधी रुपये खर्च करीत आहे. USA is on the way towards herd immunity
देशात ५३ टक्के लोकांना पहिला डोस दिलेला आहे आणि २६ टक्के लोकांमध्ये दोन्ही डोस घेतल्यानंतर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. अमेरिकेत आवश्येकतेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात लशींचा साठा आहे. यामुळेच बायडेन सरकारने दुसऱ्या देशांना लस पुरविण्यास सुरुवात केली आहे, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ‘नॅशनल ऑडिट ऑफिस एस्टिमेट’च्या अनुसार ब्रिटनने लस निर्मितीसाठी आणि खरेदीसाठी १६ अब्ज डॉलर (सुमारे एक लाख २० हजार कोटी रुपये) खर्च केले आहेत. तेथे निम्म्या लोकसंख्येने पहिला डोस घेतलेला आहे तर १६ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रत्येक एक लाख लोकांपैकी ५९ हजार ३०८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App