Sarangi : भाजप खासदार सारंगी अन् राजपूत यांच्या प्रकृतीबाबत आले अपडेट!

Sarangi

जाणून घ्या, राम मनोहर लोहिया रुग्णालयाने काय सांगितले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :Sarangi  राम मनोहर लोहिया रुग्णालयाने शनिवारी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या प्रकृतीची माहिती दिली. आरएमएलचे एमएस डॉ. अजय शुक्ला यांनी सांगितले की, सारंगी यांच्या गालाच्या हाडावर सूज आणि निळसरपणा आहे. तपासणीसाठी एक्सरे काढण्याचा विचार केला गेला आहे. डॉक्टरांनी सांगितले की भाजप खासदार मुकेश राजपूत यांना अजूनही थोडे चक्कर येत आहेत. त्यांना अस्वस्थ वाटत आहे.Sarangi



जखमी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल आरएमएल एमएस डॉ. अजय शुक्ला म्हणाले, ‘आज आम्ही पाहिले की सारंगी यांच्या गालाच्या हाडावर सूज आणि निळसरपणा आहे. हे किरकोळ फ्रॅक्चर आहे की भुवया वर दुखापत आहे आणि रक्त खालच्या दिशेने वाहत आहे हे पाहण्यासाठी आम्ही एक्स-रे काढणार आहोत. गालाच्या हाडावर थोडे रक्त जमा झाले आहे. तर मुकेश राजपूत यांना अजूनही थोडी चक्कर येत आहे. त्यांनांही अस्वस्थ वाटत आहे…आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवत आहोत.

बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. या हाणामारीत भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले. त्यानंतर त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Update on the health of BJP MPs Sarangi and Rajput

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात