विशेष प्रतिनिधी
रांची : रामनवमीची पूजा आणि दर्शनासाठी शेकडो पर्यटक रविवारी देवघर येथे दाखल झाले होते. यादरम्यान रोपवेची एक ट्रॉली खाली येत असताना ती वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे दोन डझन ट्रॉल्या वरती होत्या. Trikut mountain ropeway accident; 10 people are still trapped
झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट पर्वतीय रोपवे अपघाताचा आज तिसरा दिवस आहे. तीन ट्रॉली अजूनही अडीच हजार फूट उंचीवर अडकल्याचं सांगण्यात येत आहे.
या ट्रॉल्यांपर्यंत लष्कराचे जवान पोहोचले असून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी आणखी चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, सुमारे १० जण अजूनही अडकले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App