विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून काँग्रेस 54 वरून 99 वर पोहोचताच प्रचंड उत्साहात आलेल्या राहुल गांधींनी आरोप केला, मोदींनी केला शेअर घोटाळा; पण प्रत्यक्षात स्टॉक पोर्टफोलिओ सुधारून राहुल गांधींचा खिसा भरला!! Though rahul Gandhi targets Modi about stock market scam, his stock portfolio increases by 3.5 %
त्याचे झाले असे :
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय शेअर बाजाराच्या परफॉर्मन्सची स्तुती करताना तो लवकरच वाढेल, असे भाकीत केले होते. त्या काळात सेन्सेक्सने मोठी उसळी घेतली होती. त्याचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना झाला.
पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस एकदम 54 वरून 99 वर पोहोचली, तर भाजपा 300 वरून 240 वर खाली आली. भाजपने स्वबळावरचे बहुमत गमावले, पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मात्र सत्तेवर आली.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी 30 लाख कोटी रुपयांचा शेअर घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी वेगवेगळी प्रेझेंटेशन पत्रकार परिषदेत सादर केली. भाजपने पियुष गोयल यांना राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यास नेमले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेअर बाजारात भारतीयांचा कसा लाभ झाला, याचे वर्णन करून सांगितले. यात सुरुवातीला आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वर यांना 500 कोटी रुपयांचा फायदा झाल्याची बातमी आली कारण त्यांचा स्टॉक पोर्टफोलिओ जबरदस्त सुधारला.
आता त्या पाठोपाठ शेअर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचाच स्टॉक पोर्टफोलिओ सुधारल्याची बातमी आली आहे. राहुल गांधींचा स्टॉक पोर्टफोलिओ फोलिओ तब्बल 3.5 % नी सुधारला. त्यामुळे राहुल गांधींनी आरोप केलेल्या या कथित शेअर घोटाळ्यात त्यांचाच खिसा भरल्याचे स्पष्ट झाले. राहुल गांधींकडे इन्फोसिस, एलटीआय माइंड ट्री, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर नेस्टले इंडिया, एशियन पेंट्स, पिडिलाइट इंडस्ट्रीज या कंपन्यांचे शेअर्स आहेत. हे सगळे शेअर्स लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वधारले होते. त्यामुळे राहुल गांधींचा स्टॉक पोर्टफोलिओ 3.5 % सुधारून राहुल गांधींच्याच खिशात भरपूर पैशांची भर पडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App