विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दरवर्षी सकाळी अकरा वाजता सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प यावेळी सायंकाळी चार वाजता सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या नियमावलीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.This year’s budget will be presented at four in the evening, not in the morning due to Corona’s rules
राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज सकाळी अकरा वाजता एकाच वेळी सुरू होते. मात्र, ३१ जानेवारीपासून सकाळी ११ वाजता एकाचवेळी हे कामकाज सुरू होणार नाही. कोरोनाच्या नियमावलीमुळे राज्यसभेचे कामकाज रोज सकाळी १० वाजता सुरू होईल. दुपारी ४ वाजता लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होईल.
३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रपतींचे भाषण होणार आहे. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजता सुरू होईल. त्याच दिवशी आर्थिक पाहणी लोकसभेत दुपारी सादर केली जाईल. अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सादर केला जाईल.
गेल्या वर्ष कोरोना महामारी सुरू झाल्यावर संसदेचे २५२ वे अधिवेशन अशाच स्वरूपात घेतले गेले होते. तेव्हा राज्यसभेचे कामकाज आधी सुरू झाले होते. संसदेचे हे सलग सहावे अधिवेशन कोरोनाच्या सावटाखाली तसेच ५ राज्यांत विधानसभा निवडणूक होत असताना होत आहे.
अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारी रोजी संपेल आणि नंतर महिनाभर त्याला विश्रांती असेल. १४ मार्च रोजी पुन्हा सुरू होऊन ८ एप्रिलला अधिवेशनसंपेल. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चर्चा करून दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची वेळ एकच नसावी
तर त्यात अंतर असले पाहिजे, असा निर्णय घेतला. संसदे १४०० कर्मचारी आहेत. त्यांची तपासणी केल्यावर त्यातील २५ टक्के कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App