विशेष प्रतिनिधी
पाटणा : मुस्लिमांसाठी भारतापेक्षा चांगला देश, हिंदूंपेक्षा जास्त चांगला मित्र आणि मोदींपेक्षा जास्त चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही. संपूर्ण जगात भारताची प्रशंसा होते आहे. भारत संविधानाने चालणारा देश आहे. परंतु, अन्सारी यांना याच्याशी देणे-घेणे नाही. त्यांचा वंदेमातरमवरही आक्षेप आहे, अशी टीका बिहारचे उद्योगमंत्री व भाजप नेते शहानवाज हुसेन यांनी केली आहे.There is no better country for Muslims than India, no better friend than Hindus and no better Prime Minister than Modi, Shahnawaz Hussain slammed Hamid Ansari
प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडियन अमेरिकन मुस्लिम काउंसिलच्या कार्यक्रमात अन्सारी यांनी हिंदू राष्ट्रवादाबद्दल चिंता व्यक्त केली होती. यावर बोलताना शहानवाज हुेसेन म्हणाले, संपूर्ण देश अन्सारी यांचे विधान नाकारत आहे. कारण मुस्लिमांना आपले हित चांगले कळते. भारतासारखा चांगला देश नाही याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी निगडीत संस्थेच्या एका कार्यक्रमात हमीद अन्सारी यांनी हे विधानकेले होते. या कार्यक्रमाचं आयोजन १७ अमेरिकन संघटनांनी केलं होतं. यामध्ये ‘भारतीय अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’चाही सहभाग होता. त्रिपुरा सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात ‘भारतीय अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’ ही संघटना आयएसआय आणि इतर अतिरेकी गटांशी निगडीत असल्याचे म्हटले होते.
अन्सारी म्हणाले होते, गेल्या काही वर्षांत आम्ही अशा प्रवृत्ती आणि वर्तनांचा उदय पाहिला आहे जे आधीच्या प्रस्थापित नागरी राष्ट्रवादाच्या विरोधात आहेत. ते सांस्कृतिक राष्ट्रवादाची काल्पनिक व्यवस्था लागू करू इच्छितात. निवडणुकीतील बहुमताला धार्मिक बहुमत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच राजकीय सत्तेवर एकाधिकारशाही लागू करण्याची त्यांची इच्छा आहे. नागरिकांत त्यांच्या आस्थेच्या आधारावर फूट पाडण्याची आणि असुरक्षिततेला प्रोत्साहन देताना असे लोक दिसतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App