विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील गलितगात्र झालेल्या कॉँग्रेसच्या काही नेत्यांनी अखेर हिंमत दाखविली आहे. पक्षाच्या अत्यंत लाजीरवाण्या स्थितीस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी नव्हे तर त्यांची मुले राहूल आणि प्रियंका गांधी हे जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पक्षास वाईट अवस्था आली असल्याचे सांगण्याचे धाडस या नेत्यांनी केले आहे.The sentiments of the Congress leaders are open, they believe in Sonia Gandhi, but Rahul-Priyanka is the reason for the party’s bad days
कॉँग्रेसमधील जी-२३ या बंडखोर गटाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे म्हटले. काँग्रेसमधील बंडखोर जी-२३ नेत्यांच्या गटाने नेतृत्व तसेच पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीवर बोट ठेवल्याने काँग्रेसमध्ये अस्थितरता वाढली आहे.
असे असताना जी-२३ गटातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका, पक्षसंघटना तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
पाच राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर कार्यकारिणीने काही सूचना मागवल्या होत्या. आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक एकजुटीने लढून विरोधकांना पराभूत करण्यावर चर्चा झाली, असे आझाद यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांच्यासोबत चांगला संवाद झाला. काँग्रेसच्या सर्वच सदस्यांनी सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, यावर एकमताने निर्णय घेतलेला आहे. आम्हाला फक्त काही सूचना सांगायच्या होत्या. त्या आम्ही सांगितल्या आहेत, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
बंडखोर जी-२३ नेत्यांची भूमिका तसेच पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसध्ये वाढत असलेली अस्थिरता लक्षात घेता सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूवीर्ही जी-२३ नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बुधवारी आझाद यांच्या निवासस्थानी बंडखोर नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर गुरुवारी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासोबत बैठक घेतली होती. या आठवड्यात सोनिया यांनी गुलाम नबी आझाद यांच्याशी दोन वेळा फोनवर संवाद साधला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App