प्रतिनिधी
शिर्डी : महाराष्ट्रात कसले आलेय सूडाचे राजकारण??, सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण, लालूप्रसाद यादव यांच्या सीबीआय चौकशीच्या वेळेला केंद्रात काय भाजपचे सरकार होते का??, असा खोचक सवाल करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला केला.The politics of Suda? : Did BJP government launch CBI probe into Kalmadi, Ashok Chavan and Lalu ?; Raosaheb Danve’s sharp question
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांचे छापे पडत आहेत. त्यांना अटक होत आहे. हे सुडाचे राजकारण आहे, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.
शिर्डीच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणा पासून सूडाच्या राजकारणापर्यंतच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआय चौकशी झाली. चौकशीतून बाहेर पडल्यानंतर ते फक्त पत्रकारांना नमस्कार करुन गेले. तेव्हा भाजपने कोणतेही प्रत्यारोप केले नाहीत. पण नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ते हात उंचावत बाहेर आले. त्यांनी असा कोणता पराक्रम केला होता? त्यामुळे त्यांनी हात उंचावला?, असा खोचक सवाल दानवे यांनी केला.
नवाब मलिक यांच्या पाठिंब्यासाठी उपोषण करणे म्हणजे प्रत्यक्ष दाऊदला पाठिंबा देण्यासारखे आहे आणि महाविकास आघाडीचे मंत्री त्यालाच पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसले होते असा टोलाही त्यांनी लगावला. केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यावेळच्या यूपीए सरकारने तुरुंगात घातले. तेव्हा देखील भाजपने सूडाच्या राजकारणाचा आरोप केला नव्हता, अशी आठवण दानवे पाटील यांनी करून दिली.
सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली. अशोक चव्हाणांना आदर्श प्रकरणात सीबीआयने चौकशीसाठी बोलावले. लालूप्रसादांना चारा घोटाळ्यासाठी सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागले. त्यांना शिक्षा झाली. त्यावेळी केंद्रात भाजपचे सरकार होते का?, असा सवाल देखील रावसाहेब पाटील दानवे यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App