विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील पालम येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक अपघात टळला. दिल्ली विमानतळावर स्पाईसजेटचे विमान धावपट्टीजवळील विजेच्या खांबाला धडकले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. The plane struck a power pole near the runway
स्पाइसजेटचे विमान श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेनंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या वर्षी फेब्रुवारी महिन्यातही दिल्ली विमानतळावरून अमृतसर (पंजाब) येथे जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. हे विमान एअर विस्ताराचे होते. विमानतळ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबला जाणार्या एअर विस्तारा विमानाला हायड्रोलिक ब्रेक काम न केल्यामुळे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यावेळी विमानात एकूण १४६ प्रवासी होते. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी एअर पोर्ट प्राधिकरणाने सर्व मानकांचे पालन केले. यानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने अमृतसरला पाठवण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App