भारतातून आंब्याची पहिली खेप बेल्जियममध्ये पोहोचली!

जर्मनीच्या राजदूतांनी अशाप्रकारे व्यक्त केला आनंद The first consignment of mangoes from India reached Belgium

विशेष प्रतिनिधी

बेल्जियम : भारतामधील आंबा जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या देशातून आंबा अनेक देशांमध्ये पाठवला जातो. युरोपियन बाजारपेठेतही भारतीय आंब्याला मोठी मागणी आहे. इंडो-जर्मन कॉर्पोरेशनने यावर्षी लखनऊच्या शेतकऱ्यांसोबत FPO च्या माध्यमातून एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. उत्तर भारतातून आंब्याची पहिली खेप युरोपच्या बाजारपेठेत पोहोचली आहे.

जर्मनीचे राजदूत फिलिप अकरमन यांनी युरोपमध्ये भारतीय आंब्याची आवक झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, युरोपातील लोकांना भारतीय आंबा खूप आवडतो हे सर्वांना माहीत आहे. युरोपियन सुपरमार्केटमध्ये भारतीय आंब्याची आवक पाहून आम्हाला आनंद झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, बेल्जियमच्या बाजारपेठेत उत्तर भारतीय आंब्याच्या विविध जाती आणणे हे युरोपियन आंब्याच्या आयातीमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमामुळे भारत आणि जर्मनी यांच्यात कृषी क्षेत्रातील सहकार्य आणि व्यापाराच्या संधी वाढतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. फिलिप अकरमन पुढे म्हणाले की, मला विश्वास आहे की आता भारताने सामान्य युरोपियन स्टोअर्सपर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे.

The first consignment of mangoes from India reached Belgium

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub