वृत्तसंस्था
अजमेर : अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यातली गर्दी तब्बल 90 % ओसरली आहे. खादिम मोहम्मद चिश्ती याने नुपूर शर्मा संदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याचा मोठा परिणाम अजमेर मध्ये दिसून आला असून दर्ग्यातली गर्दी आणि दर्ग्याभोवतीच्या परिसरातील सर्व व्यापार यांना 90% पर्यंत फटका बसला आहे. The crowd at Ajmer Dargah dropped 90%; The result of Khadim’s jihadi statement
ईदच्या पार्श्वभूमीवर या परिसरात जी गर्दी दिसायची ती आज अजिबातच दिसलेली नाही. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून विशेषतः उदयपूर मध्ये कन्हैयालाल जिहादी हत्याकांड घडल्यानंतर हिंदू मानसिकतेत मोठे परिवर्तन आले असे दिसून येत आहे. त्यातूनच अजमेर शरीफ दर्ग्यातील गर्दी 90 % ओसरली आहे. याचा त्या परिसरातल्या व्यापार उदीमाला देखील मोठा फटका बसला आहे. हॉटेल ओस पडली आहेत. तेथील तेथील प्रसाद मिठाईच्या दुकानांकडे कोणी फिरकत नाही. अशी स्थिती आजच्या ईदच्या दिवशी दिसली आहे.
नुपूर शर्मा हिचे प्रेषित मोहम्मद विषयीचे वादग्रस्त वक्तव्य त्यानंतर मुस्लिम संघटनांनी तिच्या शिरच्छेदाची दिलेली धमकी त्याचवेळी उदयपूर मध्ये कन्हैयालाल आणि अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांचे घडलेले जिहादी हत्याकांड या पार्श्वभूमीवर अजमेर दर्गा परिसरात परिणाम दिसला आहे आणि त्याचा फटका शहरातील व्यापारी हॉटेल व्यवसायिक रेस्टॉरंट आणि बाकीच्या व्यापार उदीमाला बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App