विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी अॅप्सवर बंदी घातली जाते कारण ते एका मागार्ने हानिकारक असल्याचे आढळून आले आहे. आम्ही २०२० प्रमाणे याआधीही अॅप्सवर बंदी घातली आह, असे केंद्रीय अर्थंमत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.The ban was imposed because Chinese apps are harmful, Finance Minister Nirmala Sitharaman said
सुरक्षेच्या कारणाने केंद्र सरकारने ५४ चीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्युटी कॅमेरा, स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा-सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर ?ण्ड बास बुस्टर, कॅमकॉर्ड फॉर सेल्स फोर्स इएनटी, आयसोलँड 2, अॅशेस ऑफ टाईम लाईट, विवो व्हिडिओ एडिटर, टेसेंट एक्सरिव्हर, ऑ नमायोजी चेस, ऑ नमायोजी ऐरिना, अॅपलॉक, ड्युएल स्पेस लाईट या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
भारत आणि चीन यांच्यादरम्यानचे संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कारण देत गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सरकारने ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यावेळी टिकटॉक, वुईचॅट, हेलो यासारख्या प्रसिध्द अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे नव्याने ५४ चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App