वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदू तरुणाचे ‘टार्गेट किलींग’ केल्याची घटना घडली आहे. पुलवामा जिल्ह्यातील एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संजय काशीनाथ शर्मा नामक तरुणाला इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. Target killing’ of Hindu youth again in Kashmir
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अचन गावातील संजय काशीनाथ पंडित हा तरुण बाजारात जात असताना रविवारी सकाळी ११ वाजता जिहादी दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेल्या संजयला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी नाकेबंदी करून जिहादी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी या घटनेची निंदा करत हिंदू तरुणाच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App