पोलीस आरोपी बिभव कुमारच्या चंद्रवाल नगर येथील घरी त्यांना पकडण्यासाठी गेले होते. मात्र
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी कथित हल्ला झालेल्या आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर काल रात्री एम्समध्ये वैद्यकीय उपचार करण्यात आले. गुरुवारी रात्री उशीरा दिल्ली पोलिसांनी कथित हल्ल्याच्या संदर्भात एफआयआर नोंदवला आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी एम्समध्ये नेले.Swati Maliwal said what exactly happened on that day
स्वाती मालीवाल यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या ड्रॉईंग रूममध्ये थांबली असताना, केजरीवालांचे स्वीय सचिव बिभव कुमार आले आणि त्यांनी कोणतीही चिथावणी न देता तिला झापड मारली आणि पोटावर ठोसा मारला.
पोलीस आरोपी बिभव कुमारच्या चंद्रवाल नगर येथील घरी त्यांना पकडण्यासाठी गेले होते. मात्र ते सापडले नाहीत. गुन्हे शाखा आणि स्पेशल सेलचे पथक त्यांचा शोध घेत आहेत.
“मी ड्रॉईंग रूममध्ये प्रवेश केला आणि तिथे थांबले. बिभव आला आणि मला शिवीगाळ करू लागला. कोणत्याही चिथावणीशिवाय त्याने मला वारंवार झापडा मारल्या,” आप खासदाराने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नोंदवलेल्या जबाबात असे म्हटले आहे… मी ओरडत राहिले, विनवणी करत राहिले त्याला थांबवून मला जाऊ द्या, पण तो मला मारत राहिला.”
स्वाती मालीवाल यांनी निवेदनात म्हटले आहे की, “‘देख लेंगे, निपट देंगे’ अशा शब्दांत त्याने धमक्या दिल्या. त्याने माझ्या छातीवर, चेहऱ्यावर, पोटावर आणि माझ्या शरीराच्या खालच्या भागावर मारले. मी त्याला सांगितले की मला मासिक पाळी येत आहे. खूप वेदना होत असल्याने मी त्याला तिथून निघून जाण्याची विनंती केली आणि मी मदतीसाठी पोलिसांना बोलावले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App