संशतीय आतंकवादीला बंगाल मध्ये अटक!

विशेष प्रतिनिधी

बंगाल : जमात उल मुजाहिद्दीन बांग्लादेशच्या एका संशयित दहशतवाद्याला पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातून अटक केली गेली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.

Suspected terrorist arrested in Bengal

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी सुभाषग्राम या भागामध्ये शोध शोधमोहीम राबवली होती. आणि तेथूनच या बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


TERRORIST Connection : दहशतवादी मोड्युलचं मुंबई कनेक्शन;ड्रायव्हर म्हणून वावरत होता दहशतवादी समीर


अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून बनावट मतदार ओळखपत्र, आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. त्याची चौकशी अजूनही सुरू आहे. तो भारतात कसा आला? कधी आला? किती दिवसांसाठी आला? हे सर्व शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दहशतवादी गटाशी संबंधित अशी अनेक कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Suspected terrorist arrested in Bengal

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात