धक्कादायक : कार्यकर्त्याने द्रमुकच्या विजयासाठी केला होता नवस, पूर्ण झाल्याने मंदिरासमोर केली आत्महत्या

Shocking Man commits Suicide As His Wish for DMK Victory Became True in front of temple in tamilnadu

Wish for DMK Victory : तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मंदिरासमोर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. कारण त्याने एका राजकीय पक्षाच्या विजयासाठी प्रार्थना केली, जेव्हा त्याची प्रार्थना पूर्ण झाली, तेव्हा त्याने आपला जीव घेतला. Shocking Man commits Suicide As His Wish for DMK Victory Became True in front of temple in tamilnadu


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मंदिरासमोर एका व्यक्तीने आपला नवस पूर्ण झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मृत व्यक्ती सरकारी परिवहन विभागातून निवृत्त कंडक्टर होती. त्याने द्रमुक या राजकीय पक्षाच्या विजयासाठी नवस केला होता. आपला नवस पूर्ण झाल्यामुळे त्याने स्वत:चा जीव देऊन तो फेडला. त्या व्यक्तीने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले की, त्याने निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमच्या विजयासाठी आणि सेँथिल बालाजी मंत्री व्हावेत यासाठी देवाला नवस केला होता. त्याने म्हटले होते की, नवस पूर्ण झाला तर तो आत्मबलिदान देईल.

त्या व्यक्तीने द्रमुकच्या विजयासाठी नवस केला होता आणि तो पूर्ण होताच त्याने आपला प्राण त्याग केला. सकाळी उठून देव दर्शनासाठी मंदिरात तो पोहोचला. तेथे त्या व्यक्तीने आपल्या शरीराला आग लावली आणि आत्महत्या केली. मृत व्यक्ती एक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून त्याचे नाव उलागनाथन आहे. त्याचे वय 60 वर्षे होते.

द्रमुकच्या सत्तेचा नवस पूर्ण होताच दिला जीव

मंदिरातील स्थानिकांना एक चिठ्ठी सापडली आहे. ज्यात असे म्हटले आहे की, मृत व्यक्तीने द्रमुक सत्तेत परत येण्यासाठी आणि द्रमुकचे नेते आणि मंत्री सेंथिल बालाजी यांच्या विजयासाठी नवस केला होता. त्या व्यक्तीने आत्महत्येचा दिवस आषाण अमावस्या निवडला, जो तामिळ लोकांमध्ये एक शुभ दिवस म्हणून ओळखला जातो.

पोलीस तपास सुरू

मंदिरासमोर उलगनाथन याने नवस फेडण्यासाठी आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेली सुसाइड नोट जप्त केली असून परिचितांची चौकशी करत आहेत. याप्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.

Shocking Man commits Suicide As His Wish for DMK Victory Became True in front of temple in tamilnadu

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात