प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे समर्थन करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये प्रचंड धावपळ उडाली आहे. Shivsena confused over supporting drupadi murmu
शिवसेनेच्या सर्व खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांच्याच पाठीशी उभे राहण्याची आग्रही मागणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला अनुकूलता दर्शवण्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. पण त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत मोठा खुलासाही आलेला दिसतो आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असा होत नाही असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.
पण यामुळेच शिवसेनेची तळ्यात मळ्यात भूमिका आणि गोंधळलेल्या अवस्थेतून धावपळ दिसून आली आहे. स्वतः द्रौपदीमुळे सध्या पश्चिम बंगाल मध्ये आहेत. त्या तिथल्या लोकप्रतिनिधींची भेट घेत आहेत. त्यानंतर त्यांचा मुंबई दौरा अपेक्षित आहे. त्यापूर्वी जर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना जाहीर केला, तर द्रौपदी म्हणून या कदाचित मातोश्रीवर जाऊन त्यांचे आभार मानण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळेत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंब्याची भूमिका जाहीर करण्यावर अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App