विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात यावेळीही १०५ वाढ करण्यात आली आहे. १९ किलोचा LPG सिलेंडर १ मार्चपासून म्हणजेच आजपासून मुंबईत १८५७ रुपयांऐवजी १९६३ रुपयांना मिळणार आहे. तर, दिल्लीत १९०७ रुपयांऐवजी २०१२ रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता व्यावसायिक सिलिंडर १९८७ रुपयांऐवजी २०९५ रुपयांना मिळणार आहे. Rs 105 increase in commercial cylinder price
रेस्टॉरंट्स, भोजनालये आणि चहाचे स्टॉल्स इत्यादींना यामुळे १०० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. १९ किलो सिलेंडरचा सर्वात मोठा वापर या ठिकाणी होतो.
नवीन वर्षात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी, राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी १ जानेवारी पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती १०२.५० रुपयांनी कमी केल्या होत्या. दिल्लीत १९किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९९७.५० रुपये होती. असेल, सूत्रांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App